Prashant Sutar new MSLTA President
Mumbai , March 24, 2025 : Former national tennis player ,certified tennis coach, and former Tournament Director of South Asia’s only ATP 250 tennis tournament – TATA Open Maharashtra Prashant Sutar has taken over as the New President of Maharashtra State Lawn Tennis Association.
Mr. Sutar who started his tennis career in Sangli as a player took over from Shri Bharat Oza who has now taken over as the Chairman of Managing Council of Maharashtra State Lawn Tennis Association.
Sutar who has been a member of MSLTA council has been in the forefront of initiating major International tennis events including Davis Cup, ATP, WTA events in close coordination with government of Maharashtra, he was also involved with MSLTA ambitious Tribal Project at Nagpur. He has also Sponsored Top Indian players Rohan Boppana , Sumit Nagal , Anniruddha Chandrasekhar , and other junior players through his company
Mr. Sutar is Chairman and Managing Director of Aryan Pumps & Enviro Solutions, a multinational company based in Pune District, which is developing simplified solutions for the most challenging environmental cleaning and disaster management. He also established a state-of-the-art manufacturing facility that creates special purpose vehicle mounted machines with advance technology to de-silt and clean sewers and canals.
प्रशांत सुतार 'एमएसएलटीए'चे नवे अध्यक्ष
मुंबई २४ मार्च २०२५ - माजी राष्ट्रीय टेनिसपटू, प्रमाणित टेनिस प्रशिक्षक आणि दक्षिण आशियातील एकमेव एटीपी २५० टेनिस स्पर्धा असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्रचे माजी स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांची महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सांगलीतुन खेळाडू म्हणून टेनिस कारकिर्दीची सुरुवात करणारे श्री सुतार यांनी श्री. भरत ओझा यांच्याकडून अध्यक्षदाची सुत्रे नुकतीच स्विकारली. ओझा यांची महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या व्यवस्थापकीय परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
एसएसएलटीए परिषदेचे सदस्य असलेले सुतार महाराष्ट्र सरकारशी जुळवून समन्वय साधून डेव्हिस करंडक, एटीपी, डब्ल्यूटीए स्पर्धांसह प्रमुख आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा सुरु करण्यात आघाडीवर आहेत. नागपूर येथील एमएसएलटीएच्या महत्वाकांक्षी आदिवासी प्रकल्पातही सुतार यांचा सहभाग होता. सुतार यांनी आपल्या व्यावसायिक कंपनीच्या माध्यमातून रोहन बोपण्णा, सुमित नागल, अनिरुद्ध चंद्रशेखर आणि अन्य कुमार खेळाडूंना प्रायोजित केले आहे.
पुणे जिल्ह्यातील बहुराष्ट्रीय कंपनी आर्यन्स पंप्स अॅण्ड एन्व्हायरो सोल्युशनचे सुतार अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी सर्वात आव्हानात्मक पर्यावरणीय स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सरलीकृत उपाय विकसित करण्याचे काम करते. गाळ काढून टाकण्यासाठी आणि गटार तसेच कालवे स्वच्छ करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानासह विशेष उद्देश वाहनांवर बसवता येतील अशी मशीनही सुतार यांची कंपनी तयार करते.