Oasis Solapur Open MSLTA – SDLTA $ 25K ITF Womens  Tennis  from December 8 

 

Solapur, December 7 :   It will be an opportunity for Indian Girls to gain valuable points at home as seven Indian players  have made it to the main draw of the  Oasis Solapur Open MSLTA – SDLTA $ 25K ITF Women's  Tennis Tournament which is being organized by Solapur District Lawn Tennis Association(SDLTA) in association with MSLTA and played at MSLTA Tennis Center, Solapur.  
 
Sofia Costoulas of Belgium ranked 291 will lead the rankings list at the event which will see players from 13 countries participate in the event which will be held continuously for the ninth year ,   Sahaja Yamplapalli who came into limelight winning the title here last year will try to  retain her crown  and will be seen in action alongside other Indians Shrivalli Rashmikaa Bhamidipathy , Zeel Desai , Riya Bhatia ,  and youngsters Vaishnavi Adkar , Akansha Nitture Tanisha Kashyap .
 
Four other Indian players will make it to the main draw as wildcards , they include  Sejal Bhutada , Madhurima Sawant  , Humera Baharmus  and Soha Sadiq . The winner of the event will get  35 WTA points , while runner up will get  23 points , the semi finalists will recieve  14 points , while the quarterfinalist will get 8 points and the round of sixteen  4 points each with the qualifier getting  1 point 
 
Rajeev Desai the tournament director informed that the event at Solapur  has attracted good crowds as this is the only  regular international event in Solapur , The city which is one of the emerging cities i n Maharashtra Tennis  has produced many junior national champions from the city and district including Olympian Prarthana Thombare . The event has been promoted with the help of a group of local sponsors every year who are given title sponsorship on a rotation which has been unique to the tournament . Oasis Group is the title sponsor this year with Balaji Almines , Precision Camshafts and Jamshri being the other sponsors this year .  
 
  ITF Supervisor Nitin Kannamwar has been appointed as the Supervisor of the event. 
 
ओअॅसिस सोलापूर ओपन एमएसएलटीए - एसडीएलटीए 25हजार डॉलर महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेत 13 देशांतील खेळाडू सहभागी 
 
  • स्पर्धेस आज(8 डिसेंबर)पासून प्रारंभ 
सोलापूर, 7 डिसेंबर 2024- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व ओअॅसिस, प्रिसीजन, इलिझियम- जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत ओअॅसिस सोलापूर ओपन एमएसएलटीए - एसडीएलटीए 25हजार डॉलर महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेत 13 देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा 8 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत एम. एस. एल. टी. ए. टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे रंगणार आहे. 
 
स्पर्धेत 13 देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये बेल्जीयमच्या सोफिया कोस्तुलस हिला अग्रमानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेचे सलग नववे वर्ष असून या स्पर्धेत गतवर्षी सहजा यमलापल्ली हिने विजेतेपद पटकावले होते. यांसह श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती, झील देसाई, रिया भाटिया, युवा खेळाडू वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तूरे, तनिशा कश्यप हे भारतीय खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.  
 
स्पर्धेत सेजल भुतडा, मधुरिमा सावंत, हुमेरा बहारमूस, सोहा सादिक या भारतीय महिला टेनिसपटूंना वाईल्ड प्रदान करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 35 डब्लूटीए गुण, उपविजेत्या खेळाडूला 23 डब्लूटीए गुण देण्यात येणार आहेत. याशिवाय उपांत्य फेरीतील खेळाडूला 14 गुण, उपांत्यपूर्व फेरीतील 8 गुण आणि उप उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूला 4 गुण, मुख्य ड्रॉमधील खेळाडूला 1 गुण देण्यात येणार आहेत. 
 
 स्पर्धा संचालक राजीव देसाई यांनी सांगितले की, सोलापूर येथे सातत्याने होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे दर्जेदार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. राज्यांतील टेनिस क्षेत्रात सोलापूर हे शहर उभरत चालले असून ऑलिम्पिकपटू प्रार्थना ठोंबरे यांसारखे अनेक कुमार राष्ट्रीय खेळाडू या शहरातून निर्माण झाले आहेत. ओअॅसिस गुरुप हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून प्रिसीजन, इलिझियम- जामश्री व बालाजी अमाईन्स यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे. 
 
स्पर्धेची एकुण बक्षिस रक्कम 25,000/- अमेरिकन डॉलर असून स्पर्धेतील खेळाडूंना जागतिक मानांकन गुण देखील प्राप्त होणार आहेत. अशा प्रकारची अंतरराष्ट्रीय स्पर्धा सोलापूरात नवव्यांदा भरविण्यात येत आहे. ही बाब सोलापूरसाठी अत्यंत अभिमानाची व प्रतिष्ठेची आहे. या स्पर्धेसाठी भारतासह 14 देशातुन एकूण ५६ महिला सहभागी होणार असुन यामध्ये 19 महिला खेळाडू या परदेशी आहेत.

सोलापूर व लगतच्या जिल्हयामध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा व सोलापूरचे नांव जागतिक पातळीवर व्हावे या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनीस फेडरेशनने पुण्याच्या नितिन कन्नमवर यांची सामना पर्यवेक्षक तर राज्य संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांची सामना संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेने श्रीराम गोखले (पुणे), सुरजित बंडोपाध्याय (कलकत्ता), अमित देशपांडे (पुणे), पोत्रुसामी (चेन्नई), यश संत (पुणे), अमोल पुजारी (पुणे) यांची नियुक्ती केलेली आहे. या स्पर्धेसाठी फिजीओथेरपीस्ट निकिता चव्हाण (पुणे), श्वेतांबरी चव्हाण (सोलापूर), इव्हेंट मॅनेजर संध्याराणी बंडगर, दळणवळण समन्वयक मोनिका आळंद, भोजन व्यवस्था सुनंदा पवार व संतोष पवार पाहणार आहेत. तर व्हेन्यु इंनचार्ज म्हणून सुधीर सालगुडे व पुजा सालगुडे काम पाहणार आहेत.

स्पर्धेचा उदघाटन समारंभ सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मा. सौ भाग्यश्री जाधव-खेतमाळीस, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांच्या शुभहस्ते होणार आहे.स्पर्धेत उत्कृष्ट बॉल पिकरची सेवा बजावणा-या मुला-मुलींना भेटवस्तु देऊन गौरवण्यात येईल. या स्पर्धेसाठी 95-MYFM हे रेडिओ पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत.स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने दि. 8 व 9 डिसेंबर रोजी तर मुख्य फेरीचे सामने दि. 10 डिसेंबर 2024 पासुन सकाळी 9 ते संध्याकाळी5 वाजेपर्यंत खेळविले जातील.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी आली पंजवानी, मेहुल पटेल, ब्रिजेश गांधी, केशव रेडडी, सुहास अदमाने, श्रीधर देवसानी, असिम सिंदगी, राजेश पवार, अभिजित टाकळीकर, सुनिल मदन, डॉ. वैभव मेरु, डॉ साजिद सय्यद, उज्वल कोठारी, डॉ सुरेश कुमार, परेश शहा, संतोष फाटक यांचे सहकार्य लाभले.