Svercina is Champion at MSLTA 25K Mens ITF Tennis Tournament
Mumbai, November 17: Second seeded Dalibor Svercina of Czech Republic upset top seeded Khumoyun Sultanov of Uzbekistan to claim the singles title at 25K Mens ITF Tennis Tournament being organised by Maharashtra State Lawn Tennis Association (MSLTA) which concluded at the GA Ranade Tennis complex here.
In a final lasting 2 hour 12minutes Second seeded Dalibor Svercina of Czech Republic upset top seeded Khumoyun Sultanov of Uzbekistan 3-6, 6-1, 6-2 to win his second title in two weeks , Dalibor played fluent tennis to upset the higher ranked Uzbek and broke at regular intervals in the second and third set after losing the first set . The top seede 231 ranked Sultanov looked uncomfortable with a thigh pull in the second set and could not recover
Dalibor recieved the Singles trophy, $3600 ( Rs 3 Lakhs) and 25 ATP Points which will propel him 38 places higher , while runner up Sultanov got $2120 ( Rs 1,80,000)and 16 Points. The prizes were given away at the hands of Mr.Sunder Iyer, Hon Secretary of MSLTA and Mr.Manoj Vaidya, CEO of MSLTA, ITF Supervisor Nitin Kannamwar were present on the occasion.
Singles: final Round:
Dalibor Svercina([2](Cze) bt Khumoyun Sultanov (Uzb) [1] 3-6, 6-1, 6-2 (2hour 12minutes)
एमएसएलटीएच्या वतीने 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत दलिबोर सेव्हर्सिना याला विजेतेपद
मुंबई, 17 नोव्हेंबर 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या दलिबोर सेव्हर्सिना याने विजेतेपद संपादन केले.
एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात एकेरीत अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या दलिबोर सेव्हर्सिना याने उझबेकिस्तानच्या अव्वल मानांकित खुमोयुन सुलतानोवचा 3-6, 6-1, 6-2 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 2तास 12मिनिटे चालला. दलिबोर याचे हे दोन आठवड्यातील दुसरे विजेतेपद आहे. पहिला सेट गमावल्यानंतर दलिबोरने अव्वल मानांकित खुमोयुनविरुद्ध दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये अफलातून खेळ करत विजय मिळवला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक, 3600डॉलर(3लाख रुपये), 25गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक, 2120डॉलर(1लाख 80हजार रुपये), 16गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयटीएफ सुपरवायझर नितीन कन्नमवार, एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: एकेरी: पुरुष गट:
दलिबोर सेव्हर्सिना[2](चेक प्रजासत्ताक)वि.वि.खुमोयुन सुलतानोव (उझबेकिस्तान)[1] 3-6, 6-1, 6-2.