AITA National coaches workshop in Pune 

 
Pune MAY 24, 2024: The 11th AITA National coaches workshop will be held at the PYC Hindu Gymkhana in Pune on June 7 and 8.
 
Tennis coaches, coaches from other sports, tennis facility managers, tennis enthusiasts and parents of players can attend the workshop.
 
The theme of the workshop this time would be, technology and allied services in tennis. 
 
Miguel Crespo, Head of participation and education of the International Tennis Federation (ITF) will deliver the keynote address. 
 
Dr. Ales Filipcic, the Davis Cup captain of Slovenia, and professor at the University of Ljubljana will also address the coaches in the conference.
 
The course fee will be Rs.9,000.
 
For more details pls contact: Mr.Manoj Vaidya, CEO, MSLTA 9819467536
 
अखिल भारतीय टेनिस संघटनेतर्फे प्रशिक्षकांसाठी पुण्यात 7 जूनपासून कार्यशाळा
 
पुणे, 24 मे 2024: अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली प्रशिक्षकांसाठीची 11 वी राष्ट्रीय कार्यशाळा पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे येत्या 7 व 8 जुन 2024 रोजी पार पडणार आहे. 
 
या कार्यशाळेत टेनिस प्रशिक्षकांसह इतर सर्व क्रिडा प्रकारांमधील प्रशिक्षक, टेनिस संबंधी सर्व उपक्रमांचे व्यवस्थापक, टेनिस शौकीन आणि टेनिस पटूबरोबरच अन्य क्रिडा प्रकारांमधील खेळाडूंचे पालक यांना सहभागी होता येणार आहे. 
 
सध्याच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुविधांचा टेनिस मध्ये केला जाणारा उपयोग ही या कार्यशाळेची मध्यवर्ती संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेच्या सर्वसाधारण सभा व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख मिगेल क्रेस्पो यांचे या कार्यशाळेत व्याख्यान होणार आहे. मिगेल क्रेस्पो यांच्याबरोबरच स्लोव्हेनियाच्या डेव्हिस कप संघाचे कर्णधार आणि ज्युब्लीजाना विद्यापीठातील प्राध्यापक डॉ ॲलेस फिलिपकिक यांचेही बहुमोल मार्गदर्शन या कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रशिक्षकांना लाभणार आहे.
 
या दोन दिवसीय कार्यशाळेचे शुल्क प्रत्येक सहभागीसाठी 9000रुपये असे आहे. 
 
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संपर्क: मनोज वैद्य 9819467536