Tatjana to clash with Nigina in singles finals at 22nd edition of NECC Deccan ITF $40000 Women’s Tennis Tournament

Tatjana to clash with Nigina in singles finals at 22nd edition of NECC Deccan ITF $40000 Women’s Tennis Tournament

  • Ankita/ Prarthana enter doubles finals


Pune, January 27, 2023:  Top seed and world No 71  Tatjana Maria of Germany will clash second seeded Nitin’s Abduraimova of Uzbekistan in the singles finals , while the Indian top seeded pair of  Ankita Raina and Prarthana Thombare entered the doubles final at the  22nd edition of the NECC Deccan ITF $40000 Women’s Tennis Tournament India’s longest-running international tennis tournament  organised under the auspices of the ITF, AITA and MSLTA by Deccan Gymkhana and sponsored by National Egg Coordination Committee (NECC) at the Deccan Gymkhana Tennis Courts.

 In the singles semifinals topseeded Tatjana Maria  who was a semifinalist at Wimbledon registered a 6-3,6-1 win over India No 1 Ankita Raina (IND) in 1 hr and 18mins , Tatjana will take on second seeded   Nigina Abduraimova  of  Uzbekistan  who struggled to get past a fighting seventh seed Valeria Savinykh  of Russia 6-4, 2-6, 6-4 in 2 hrs and 35mins battle .

In the Doubles Semifinal  Top seeded Indian pair of. Ankita Raina and Prarthana Thombare outplayed third seeded pair of Diana Marcinkevica of Latvia and Dutch player Rosalie Van Der Hoek 6-1, 6-2 to enter the finals. , the Indian pair will take on unseeded Kazakh  pair of  Gozal Ainitdinova  and Zhibek Kulambayeva   Who edged out second seeded Rutuja Bhosale  and Ekaterina Yashina   6-4, 2-6, 10-5  

The finals of the event will be played on Saturday  28 January

Following are the results: Singles: Semifinal Round:
Tatjana Maria (GER) [1] bt Ankita Raina (IND) [8] 6-3, 6-1  
Nigina Abduraimova (UZB)[2] bt Valeria Savinykh (RUS) [7]  6-4, 2-6, 6-4 

Doubles: Semifinal Round
Gozal Ainitdinova (KAZ)/ Zhibek Kulambayeva (KAZ) bt Rutuja Bhosale (IND) [2] /Ekaterina Yashina(RUS)  6-4, 2-6, 10-5  

Ankita Raina(IND)/Prarthana Thombare (IND)[1] bt Diana Marcinkevica (LAT)/Rosalie Van Der Hoek (NED) [3]  6-1,6-1

 
 
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत तात्जाना मारिया व निगिना अब्दुरैमोवा यांच्यात अंतिम लढत 
 
  • दुहेरीत अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे यांचा अंतिम फेरीत प्रवेश 
 
पुणे, 27 जानेवारी 2023: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत एकेरीत जर्मनीच्या तात्जाना मारिया, उझबेकीस्तानच्या निगिना अब्दुरैमोवा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, दुहेरीत अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत एकेरीत पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 71व्या स्थानी असलेल्या व विम्बल्डन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या अव्वल मानांकित जर्मनीच्या तात्जाना मारिया हिने भारताच्या व आठव्या मानांकित अंकिता रैनाचा 6-3, 6-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 18मिनिटे चालला. सामन्यात सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 3-3 अशी बरोबरी निर्माण झाली. आठव्या गेममध्ये मारियाने अंकिताची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3 असा जिंकून अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये मारियाने अंकिताला कमबॅक करण्याची फारशी संधी दिलीच नाही. या सेटमध्ये मारियाने आपले वर्चस्व राखत हा सेट पाचव्या व सातव्या गेममध्ये अंकिताची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1असा सहज जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. तत्पूर्वी काल उपांत्यपूर्व फेरीत भारताची अव्वल मानांकित टेनिसपटू अंकिता रैनाने कारमान कौर थंडीचा 4-6, 7-5, 7-6(4) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती. 
 
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उझबेकीस्तानच्या दुसऱ्या मानांकित निगिना अब्दुरैमोवा हिने रशियाच्या सातव्या मानांकित व्हॅलेरिया सविनिखचा 6-4, 2-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना 2तास 35मिनिटे चालला.
 
दुहेरीत उपांत्य फेरीत भारताच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे या अव्वल मानांकित जोडीने लात्वियाच्या डायना मार्सिन्केविका  व नेदरलँडच्या रोसाली व्हॅन डेर होक यांचा 6-1,6-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. कझाकस्तानच्या गोझल ऐनितदिनोवा व झिबेक कुलंबायेवा यांनी भारताच्या ऋतुजा भोसले व रशियाच्या एकतेरिना याशिनाचा सुपर टायब्रेकमध्ये 6-4, 2-6, 10-5 असा पराभव केला. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे सामने शनिवार, 28 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- उपांत्य फेरी
निगिना अब्दुरैमोवा (उझबेकीस्तान) [2] वि.वि.व्हॅलेरिया सविनिख (रशिया)[7] 6-4, 2-6, 6-4;
तात्जाना मारिया (जर्मनी) [1]वि.वि.अंकिता रैना (भारत) [8] 6-3, 6-1;
 
दुहेरी गट- उपांत्य फेरी
अंकिता रैना(भारत)/ प्रार्थना ठोंबरे  (भारत)[1] वि.वि.डायना मार्सिन्केविका (लातविया)/रोसाली व्हॅन डेर होक (नेदरलॅंड) [3] 6-1,6-1
गोझल ऐनितदिनोवा/झिबेक कुलंबायेवा (कझाकस्तान) वि.वि ऋतुजा भोसले (भारत) [2] / एकतेरिना याशिना (रशिया) 6-4, 2-6, 10-5(1 तास 21 मिनीट)
 
 
Our Partners
  • MSLTA Under 10 tennis circuit
  • Tennis Hub India
  • Enerzal - Energy & elctrolyte drink
Event Associates
  • All India Tennis Association
  • Asian Tennis Fedaration
  • International Tennis Number
  • International Tennis Fedaration