Purcell takes third title in a row wins PMR Open ATP Challenger 100 Men’s International Tennis Championships
Pune, March 5, 2023: The Australian third seed Max Purcell continued his brilliant run on the Indian swing of the ATP challengers adding the Pune title to his Titles at Chennai and Bengaluru winning the singles title at PMR open ATP challenger men’s 100 tennis championship. powered by Aryan Pumps and organized by the Maharashtra State Lawn Tennis Association (MSLTA) at the Shri Shiv Chhatrapati Sports Complex, Tennis Stadium.
The third seeded Purcell ranked 155 currently took 1 hour and 18 minutes to outclass 19 years Luca Nardi of Italy currently ranked 158 6-2, 6-3.
While Purcell will move to Top 100 at 95th in the ATP rankings , Nardi will move 25 places to top 125 .
Winners Max Purcell got Trophy, $17,650 and 100 APT Points, Runner up Luca Nardi got Trophy, $10,380 and 60 ATP Points. Prizes were given away at the hands of Rahul Ranjan Mahiwal, PMRDA Commissioner, MSLTA Chairman Prashant Sutar, Hon Secretary of MSLTA and Tournament Director Sunder Iyer . Jt . Secretaries of MSLTA Rajiv Desai, and Sheetal Bhosale and. ATP Supervisor Rogerio Santos ,
Hide quoted text
Following are the Results: Main Draw: Final Round: Singles:
Max Purcell (AUS, 155) [3] bt Luca Nardi (ITA, 158) [4] 6-2, 6-3(1hr, 18 mins)
पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मॅक्स पर्सेल याला विजेतेपद
पुणे, 5 मार्च 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या तिस-या मानांकीत मॅक्स पर्सेल याने इटलीच्या चौथ्या मानांकीत लुका नार्डी याचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या 1 तास 18मिनीटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमांक 155 असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या तिस-या मानांकीत मॅक्स पर्सेल याने जागतिक क्रमवारीत 158 व्या स्थानी असलेल्या इटलीच्या चौथ्या मानांकीत लुका नार्डी याचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मॅक्सने पहिल्या सेटमध्ये पाचव्या व सातव्या गेममध्ये लुकाची सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट 6-2 असा सहज जिंकला.आपल्या खेळात सातत्य राखत मॅक्सने दुस-या सेटमध्ये पाचव्या व नवव्या गेममध्ये लुकाची सर्व्हिस ब्रेक करत दुसरा सेट 6-3 असा जिंकत विजेतेपद पटकावले. मॅक्सने भारातात सलग चेन्नई, बेंगलुरू नंतर पुण्यात हे तिसरे विजेतेपद पटकावण्याचा विक्रम केला आहे. एटीपी चॅलेंजर मध्ये सलग तीन विजेतेपद पटकावत मॅक्स जागतिक क्रमवारीत 95 व्या स्थानावर पोहोचला आहे. मॅक्सने चेन्नई मध्ये अमेरीकेच्या निकोलस मोरेनो डी अल्बोरान याचा तर बेंगलुरू येथे जागतीक क्रमांक 128 अलेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याचा पराभव केला होता.
स्पर्धेतील विजेत्या मॅक्स पर्सेल याला करंडक, 17,650 डॉलर व 100 एटीपी गुण तर उपविजेत्या लुका नार्डी याला करंडक, 10,380 डॉलर व 60 एटीपी गुण अशी पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरण पीएमआरडीए कमिशनर राहुल रंजन महीवाल, एमएसएलटीएचे चेअसमन प्रशांत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, शितल भोसले, एटीपी सुपरवायझर आंद्रेई कॉर्निलोव्ह, एमएसएलटीएचे मानद सचिव आणि स्पर्धेचे संचालक सुंदर अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुख्य ड्रॉ- अंतिम फेरी- एकेरी गट:
मॅक्स पर्सेल (ऑस्ट्रेलिया) [3] वि.वि लुका नार्डी (इटली) [4] 6-2, 6-3




