Tatjana Maria wins singles , Ankita -Prarthana Lift doubles title at 22nd edition of NECC Deccan ITF $40000 Women’s Tennis Tournament

Tatjana Maria wins singles , Ankita -Prarthana Lift doubles title at 22nd edition of NECC Deccan ITF $40000 Women’s Tennis Tournament

Pune, January 28, 2023: Topseeded Tatjana Maria of Germany and Indian Olympians Ankita Raina and Prarthana Thombare won the singles and doubles titles at the 22nd edition of the NECC Deccan ITF $40000 Women’s Tennis Tournament India’s longest-running international tennis tournament  organised under the auspices of the ITF, AITA and MSLTA by Deccan Gymkhana and sponsored by National Egg Coordination Committee (NECC) at the Deccan Gymkhana Tennis Courts.

In the singles finals lasting 1 hour and 38 minutes top seeded , semifinalist at Wimbledon, WTA Comeback player of the year and world ranked 71 Tatjana Maria outplayed Nigina Abduraimova  of Uzbekistan  6-1, 6-1 in a one sided final

Olympians  and top seeded Ankita Raina and Prarthana Thombare  came back from loss of the first set to get past a fighting Kazakhstan pair of Gozal Ainitdinova  and Zhibek Kulambayeva 4-6, 7-5, 10-8(59 min) to win their second title together after coming back and the first of the year

The Singles winners got a trophy and  70  points  and $6094 (₹5 Lakhs) as prize money while the runner up got a trophy and 42 points and $3257 (₹2.65lakhs) . doubles winners got a trophy and 70  points and $2230 (₹1.82lakhs)  while the runner up got a trophy,  42 points and $1115 (₹91000) .

The prizes were given away at the hands of DCP Smartana Patil ( IPS ), Mr.Sunder Iyer, Hon.Sec.of MSLTA, Mr Ashwin Girme Tournament Director and tennis secretary of Deccan Gymkhana, Mr.Mihir Kelkar, Finance Secretary of Deccan Gymkhana,  ITF Supervisor Sheetal Iyer, Leena Nageshkar were present on the occassion.

Following are the results: Singles: Final Round:
Tatjana Maria (GER) [1] bt Nigina Abduraimova (UZB)[2] 6-1, 6-1(1h, 38 min)

Doubles: Final Round: 
Ankita Raina(IND)/Prarthana Thombare (IND)[1] bt Gozal Ainitdinova (KAZ)/ Zhibek Kulambayeva (KAZ) 4-6, 7-5, 10-8(59 min)

22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000 डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत जर्मनीच्या तात्जाना मारिया हिला विजेतेपद

  • दुहेरीत भारताच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे यांना विजेतेपद


पुणे, 28 जानेवारी 2023: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या एकेरीत जर्मनीच्या जागतिक क्रमवारीत 71व्या स्थानी असलेल्या तात्जाना मारिया हिने विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत भारताच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे या जोडीने विजेतेपद पटकावले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या एकेरीच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या अव्वल मानांकित तात्जाना मारिया हिने दुसऱ्या मानांकित उझबेकीस्तानच्या निगिना अब्दुरैमोवाचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 1तास 38मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये मारियाने सुरेख खेळ करत तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये निगिनाची सर्व्हिस ब्रेक केली व विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या निगिनाला कमबॅक करण्याची संधी दिलीच नाही. पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये मारियाने निगिनाची सर्व्हिस भेदली. पण अखेर सहाव्या गेममध्ये निगिनाने मारियाची सर्व्हिस रोखली व सामन्यात 5-1 अशी स्थिती निर्माण झाली. आघाडीवर असलेल्या मारियाने आपले वर्चस्व कायम राखत निगिनाची पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

दुहेरीत अंतिम फेरीत अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे या अव्वल मानांकित भारतीय जोडीने कझाकस्तानच्या गोझल ऐनितदिनोवा व झिबेक कुलंबायेवा यांचा 4-6, 7-5, 10-8 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 59मिनिटे चालला.दुहेरीतील विजेत्या जोडीला करंडक व 70 गुण, 2230डॉलर (1.82रुपये), तर उपविजेत्या जोडीला करंडक, 42 गुण व 1115डॉलर (91000रुपये) अशी पारितोषिके देण्यात आली. 


स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, 70गुण व 6094डॉलर(5लाख रुपये), तर उपविजेत्या खेळाडूला करंडक, 42 गुण व डॉलर3257 (2.65)रूपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण  स्मार्तना पाटील(आयपीएस), एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहिर केळकर, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आणि लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- अंतिम फेरी
तात्जाना मारिया (जर्मनी) [1] वि.वि निगिना अब्दुरैमोवा (उझबेकीस्तान) [2] 6-1, 6-1 (1 तास 38 मिनीट)
दुहेरी गट- अंतिम फेरी
अंकिता रैना(भारत)/ प्रार्थना ठोंबरे  (भारत)[1] वि.वि गोझल ऐनितदिनोवा/झिबेक कुलंबायेवा (कझाकस्तान) 4-6, 7-5, 10-8 (59मिनीट)

 
 
Our Partners
  • MSLTA Under 10 tennis circuit
  • Tennis Hub India
  • Enerzal - Energy & elctrolyte drink
Event Associates
  • All India Tennis Association
  • Asian Tennis Fedaration
  • International Tennis Number
  • International Tennis Fedaration